आयुर्वेदीक

ही शेंग कुठे मिळाली तर पालापाचोळा समजून टाकून देऊ नका, घरी घेऊन या, आश्चर्यचकित करणारे फायदे आहेत ह्या झाडाचे…

नमस्कार मित्रांनो, आमच्या “आजीबाईचा बटवा” पेजमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज एका महत्वपूर्ण झाडाची माहिती मी घेऊन आले आहे जे झाड औषधांचे भांडार आहे, मग त्याची पाने असो, मूळ असो, फळ किंवा साल असो. हे झाड कदाचित तुमच्या घराच्या जवळपास आढळून येईल. हे आहे ” बाभुळीचे झाड”. बाभुळीची जी पाने असतात, शेंगा असतात त्या कोणकोणत्या आजारात आपल्याला फायदेमंद आहेत. जर कुठेही ह्या शेंगा सापडल्या,तर तोडून घरी घेऊन या. पूर्ण भारतात ह्याचे वृक्ष आढळतात.

बाभूळ गुणधर्म-मी इथे काही ताजी पाने घेतली आहेत. पिवळ्या रंगाची चमकदार सुंदर अशी फुले ह्या झाडाला येतात. हे झाड काटेदार असते व काटे सफेद रंगाचे असतात. बाभुळीचे झाड, फांदी ह्यावर मोठे काटे लागलेले असतात. पाने मात्र लहान लहान असतात. ह्याच्या शेंगा १०-१५ सेंटिमीटर लांब असतात, कच्च्या असताना त्या शेंगा हिरव्या असतात व पिकल्या, सुकल्या कि भुऱ्या रंगाच्या दिसतात. ह्याच्या शेंगा वाटून त्याची पावडर तयार केली जाते, जी सांधेदुखीवर आपल्याला आराम देते. जुन्यात जुना संधिवात ह्यामुळे ठीक होतो.

बाभुळीचा गोंद – गुणकारी व शक्तिवर्धक बाभुळीची जी साल असते त्यातून जो गोंद निघतो, ज्याला आपण “बाभुळीचा गोंद” असे म्हणतो. पांढऱ्या रंगाचा हा गोंद असतो, हा खूपच शक्तिवर्धक असतो. त्याचप्रमाणे ह्याची पाने सुकवून बरेच लोक त्याची पावडर बनवितात. आयुर्वेदामध्ये ह्या झाडाचे खूपच महत्व आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये ह्याच्या शेंगांचा, पानांचा, डहाळीचा उपयोग केला जातो. साधारण जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ह्याच्या शेंगा येतात. नंतर ह्या सुकून भुऱ्या रंगाच्याहोतात.

दातांसाठी फायदेशीर- सगळ्यात प्रथम आपण दातांच्या कमजोरीबद्दल बोलूया. अनेक वेळा आपल्या दातांमध्ये वेदना होतात, कीड लागते, हिरड्यांमधून रक्त येते, हिरडयांना सूज येते, अशा वेळी आपण बाभूळीच्या काडीने (डहाळीने) दात घासले, तर दातांच्या वेदनांपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल. असे तर दात फक्त दोनच झाडांच्या काडीने घासले जातात एक तर कडुनिंब व दुसरे बाभुळीची डहाळी. कडुनिंबापेक्षा पण ह्याने केलेले मंजन फायदेशीर असते.तोंडासंबंधी,दातांसंबंधी सगळे आजार दूर होतील. हे झाड जरी काटयांनी भरलेले असले, तरी औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे. पायरियासाठी पण ह्याचे मंजन उपयोगी आहे.

गुडघेदुखीवर रामबाण- ह्याच्या शेंगाची पावडर जर घेतली तर ती गुडघेदुखीवर रामबाण आहे. तोंडातील छाले – ह्याची पाने चावून खाल्ली तर तोंडातील छाले ठीक होतात. गावातील लोक ह्याची पाने सुकवून ठेवतात. जर कधी तोंडात छाले झाले, हिरडीतून रक्त येतआहे, तर ह्याची पाने चावून खा. त्याच्या रसाचा फायदा होईल. ह्याची साल सुकवून त्याची पावडर अनेक दातांच्या मंजन पावडरमध्ये वापरली जाते. तुम्ही ऐकले असेल अनेक टूथपेस्टमध्ये ह्याचा वापर केला जातो.

गोंद फायदे- ह्याच्या सालींमधून जो गोंद निघतो, तो खाल्ल्यामुळे शारीरिक कमजोरी दूर होते, शरीरात स्फूर्ती येते. सांधेदुखीसाठी रामबाण- आपल्याला मार्केटमध्ये ह्याच्या शेंगांची पावडर तयार मिळते. रोज एक चमचा पावडर पाण्यात मिसळून घ्या. एक आठवडा घेऊन बघा,तुमची जुन्यात जुनी कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा हाडांशी संबंधित कोणताही आजार ठीक होतो, हाडे मजबूत होतात कारण ह्यामध्ये कॅल्शियम असते.

अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये १ छोटा चमचा पावडर टाकून घ्या. आयुर्वेदिक दुकानात ही पावडर मिळू शकते. ह्या झाडाची पाने, साल, शेंगा सगळेच खूप फायदेमंद आहे. आमची माहिती आवडली तर जरूर लाईक व शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button