Sports

हिवाळ्यात फक्त रोज १ चमचा हा खुराक चालू करा- १०० वर्षांपर्यंत तुमची हाडे मजबूत राहतील, सांध्यांमधील वेदनांचा त्रास कधीच सतावणार नाही

नमस्कार “आजीबाईचा बटवा” या पेजमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, थंडी सुरु झाली कि हाडांच्या समस्या सुरु होतात. त्यासाठी आज एक असा उपाय  घेऊन आलो आहोत, ज्यामुळे पुढील अनेक वर्षे
ह्या समस्या होणार नाहीत. फक्त हा पदार्थ १ चमचा रोज खायला सुरुवात करा.

कृती- मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे. आता त्यामध्ये मी ३-४ टेबलस्पून तूप टाकते आहे. आपण इथे थोडे जास्त देशी तूप टाकणार आहोत, कारण आपल्याला त्यामध्ये डिंक तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, मी साधारण १/२ कप तूप घेतले आहे. आता मी १/४ कप डिंक घेतला आहे, जो तुम्हाला वाण्याच्या दुकानात मिळू शकतो.

डिंक-फायदे डिंक हा सांध्यांच्या वेदनांवर खूपच परिणामकारक आहे. कोणत्याही प्रकारची गुडघेदुखी,कंबरदुखी ह्यावर डिंक फायदेशीर आहे. आता मी हा इथे तळून घेतला आहे. चांगला तळल्यावर हा फुलतो व कुरकुरीत होतो. आता डिंक एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे.

कमरकस-कंबरेसाठी उत्तम आता कढईत अजून तूप आहे, आता पुढील वस्तू आहे कमरकस. हे कंबरेच्या वेदनांवर अत्यंत फायदेमंद आहे. हे तुम्हाला ऑनलाईन किंवा वाण्याच्या दुकानात मिळू शकते. ते पण तळून घ्यायचे आहे. ते तळल्यावर फुलते व रंग फिका होतो.

मखाणे -कॅल्शियम स्रोत आता उरलेल्या तुपात मी मखाणे १ चमचा टाकणार आहे. मख़ाण्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. हाडांच्या वेदनांवर मखाणे उत्तम असतात. ३-४ मिनिट हे तळून घेतले आहेत. आता ह्या सगळ्या वस्तू बाजूला ठेवा.

बदाम, काजू- पौष्टिक व ताकद देणारे मी आता कढईत परत तूप घातले आहे. आता त्यामध्ये मी १/२ कप खसखस घालते आहे. खसखस पौष्टीक असते व आपल्याला ताकद देते. खसखस सेवन केल्यामुळे झोप उत्तम येते. आता ह्यामध्ये २ टेबलस्पून बदाम टाकते आहे. बदामामध्ये पण कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते. पुढील वस्तू मी घेणार आहे काजू, काजू पण ताकद देणारे आहेत. ड्रायफ्रूट तुम्ही कमीजास्त करू शकता.

पुढील वस्तू आहे ते म्हणजे मेलनसीड्स म्हणजेच टरबूजाच्या बिया. हे सगळे मंद गॅसवर भाजून घ्या. आता मी ह्यामध्ये सुके खोबरे १/४ कप टाकते आहे. हलके भाजून घ्या. आता हे बाजूला प्लेटमध्ये काढून घ्या. मखाणे व कमरकस आपल्याला मिक्सरवर जाडसर करून घ्यायचे आहे. कमरकस आपल्याला कमी टाकायचे आहे, जास्त नाही नाहीतर चव कडू येईल.

हलवा बनवण्याची पद्धत – आता कढईत परत तूप थोडे जास्त घेऊन आता त्यामध्ये १/२ कप गव्हाचे पीठ टाका. हे पीठ ७-८ मिनिटे चांगले भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये मी २ चमचे बेसन घालणार आहे ज्यामुळे पदार्थाला चांगली चव येईल. तूप कमी वाटले तर थोडे टाका. तूप जास्त झाले तरी चालेल कारण ते शरीराला ताकद देते. आता ह्यामध्ये २ कप पाणी टाका. आता ह्यामध्ये मी गुळ टाकणार आहे, तुम्ही साखर पण टाकू शकता. आता मंद गॅसवर हे मिश्रण शिजवा. गूळ बारीक चिरून घ्या.

आता त्यामध्ये मखाणे व कमरकस टाका. आपण तयार करणार आहोत डिंक व कमरकस ह्यांचा हलवा. आता बाकीचे सर्व पदार्थ ड्रायफ्रूट त्यामध्ये टाका. थोडा वेळ हे मिश्रण ढवळत राहा. आता ह्यामध्ये थोडी सुंठपावडर, काळीमिरीपावडर, थोडे तूप टाकून शिजवा. हा हलवा २-२ चमचे रोज खायचा आहे. आपला हलवा आता तयार आहे. असा हलवा बनवून ठेवा व रोज २ चमचे खा, कंबरदुखी, गुडघेदुखी कधीच त्रास देणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button