प्रदूषण व सिगारेटमुळे फुफ्फुसात निर्माण होणारी घाण होईल १ मिनिटात साफ…

नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनेलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, हा विडिओ बघून तुम्ही हे तर समजून गेला असाल, कि सिगारेट आपल्या फुफ्फुसांना दूषित कशा पद्धतीने करते. जसे कि हा कापूस सिगारेटच्या धुरामुळे कापसाला शोषून काळा झाला त्याप्रमाणे आपली फुफ्फुसे पण सिगारेटच्या धुरामुळे काळी होऊन खराब होऊ लागतात.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एक सिगारेट जाळल्यामुळे एकूण ४००० प्रकारचे वेगवेगळे केमिकल्स त्यातून निघतात, ज्यातील ४०० खूप जास्त प्रमाणात विषारी असतात व ४३ असे केमिकल्स असतात जे कॅन्सरसारखा आजार निर्माण करतात. जसे कोणी व्यक्ती सिगारेट पितो, तर त्या सिगारेटचा धूर फुफ्फुसांमध्ये जाऊन आपल्या ब्लडसेल्सस मध्ये जातो, ज्यामुळे आपले रक्त दूषित होऊ लागते.
जेव्हा हे दूषित रक्त आपल्या पूर्ण शरीरात पसरते, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ लागतात. त्याचबरोबर शरीरातील ताकद व स्फूर्ती पूर्णपणे समाप्त होते व चिडचिडेपणा येतो. त्याचबरोबर हे आपल्या शुक्राणूंना पण कमी करण्याचे काम करते. आज भारतामध्ये प्रतिवर्षी जवळजवळ २७ लाख लोक कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने पीडित आहेत.
ह्या २७ लाख लोकांपैकी १५ लाख लोक असे आहेत ज्यांना कॅन्सर केवळ सिगारेट ओढण्यामुळे झाला आहे. म्हणून,तुमच्यासाठी हे खूप जरुरी आहे, कि जर तुम्ही सिगारेट ओढत असाल, तर वेळोवेळी तुम्ही तुमची फुफ्फुसे डिटॉक्स करणे अत्यंत जरुरी आहे.
आता मी तुम्हाला ४ असे विशेष उपाय सांगणार आहे जे तुम्ही आठवड्यातून फक्त २ दिवस जरी केले तरी तुम्ही आधी कितीही सिगारेट ओढलेली असो, ह्या पद्धतीने उपाय केल्यावर तुमची फुफ्फुसे एकदम डिटॉक्स व साफ होतील.
टीप क्रमांक १ – डिटॉक्स ज्यूस तुम्ही हा ज्यूस तुमच्या घरी बनवू शकता. त्यासाठी आपल्याला लागणार आहे १ मोठा आल्याचा तुकडा. आल्यामध्ये असे गुणधर्म असतात जे आपली फुफ्फुसे स्वच्छ करते व त्याबरोबर आपल्या शरीरातील कफ पण साफ करते. प्रथम आले किसून त्याचा १ चमचा रस काढून घ्या. त्यानंतर दुसरी वस्तू आहे मुलेठी. आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला ही मिळेल. ह्या प्रकारची मुळे तुम्हाला दिसतील.
ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तयार पावडर घेऊ नका. १/२ चमचा मूलेठी पावडर १ कप पाण्यात मिसळून गरम करायचे आहे. नंतर हे एका ग्लासात घेऊन त्यात २-३ चमचे लिंबूरस टाका व सगळ्यात शेवटी त्यात १ चमचा मध टाका. मध फुफ्फुसातून कफ बाहेर काढण्यास मदत करतो. आता हा ज्यूस तयार आहे, हा सकाळी व संध्याकाळी चहा प्रमाणे घोट घोट प्यायचा आहे.
टीप क्रमांक २– कपालभाती प्राणायाममी जसे तुम्ही सकाळी उठता, त्यानंतर १० मिनिटांनी तुम्हाला मोकळ्या जागीमी बसून १० मिनिटे कपालभाती प्राणायाम करायचा आहे. रात्री झोपताना तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स तुमच्या फुफ्फुसात जाऊन जमा होतात. सकाळी उठल्यावर जर तुम्ही कपालभाती प्राणायाम केला, तर श्वास बाहेर फेकताना कार्बनडायऑक्साईड बरोबर टॉक्सिन्स बाहेर निघून जातात. आठवड्यातून २-३ दिवस जरूर करा.
टीप क्रमांक ३- पाण्याचे सेवन दिवसातून जास्तीत जास्त ३-४ लिटर पाणी जरूर प्या. पाणी ही एकमेव अशी वस्तू आहे जी तुमच्या पूर्ण शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. त्यालोकांसाठी हे खूपच जरुरी आहे जे कोणत्याही प्रकारचे धूम्रपान करतात किंवा दारू पितात. अशा लोकांनी पाणी ३-४ लिटर प्यायले पाहिजे. पाणी तुमच्या शरीरातील कोणत्याही प्रकारचे टॉक्सिन्स लघवीवाटे, घामावाटे बाहेर टाकते.
टीप क्रमांक ४– तुमचे शरीर तुम्हाला सगळे देते आहे जे तुमच्यासाठी गरजेचे आहे. तुम्ही खात-पीत आहात, शरीराच्या मदतीने पैसे कमावत आहात, तुमच्या सगळ्या इछा पूर्ण होत आहेत. पण तुम्ही तुमच्या शरीराला २०-२५ मिनिटे वेळ देत नाही. तुम्ही प्रत्येक चुकीचे काम करीत आहात., ज्यामुळे तुमचे शरीर खराब होते आहे. त्यासाठी आताच सावध व्हा व शरीराची काळजी घ्या. दिवसभरात २०-२५ मिनिटे कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम जरूर करा. असा व्यायाम करा ज्यामुळे तुमचा श्वास वेगाने होईल ज्यामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होईल.